भंडारा जिल्हा भाजयुमो तर्फे मोहाडी येथे 88 युवकांना रोजगार





मोहाडी: भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्हा तर्फे जिल्हाध्यक्ष तिलक वैद्य यांच्या नेतृत्वात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने जिल्हाभर तालुका निहाय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरविले होते त्या निमित्ताने दिनांक 21 मार्च 2022 ला मोहाडी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सेक्युरिटी स्किल काँन्सिल  ऑफ इंडिया आणि एस आय एस इंडिया लिमिटेड तर्फे सुरक्षा जवान पुरुष पदासाठी मेगा भरती घेण्यात आली. भरती ही भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आली.कोरोना महामारी च्या संकटामुळे बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून तरुणांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने एक प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. या मेळाव्यात तालुक्यातील 348 युवक सहभागी झाले, सहभागी झालेल्या युवकांची चाचणी होऊन 88 युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. पुढील ट्रेनिंग करिता भंडारा जिल्ह्यातील पहिली टीम दिनांक 27 मार्च ला हैदराबाद साठी रवाना होत आहे.भरती साठी दत्त मंदिर मोहाडी येथे मेळावा आयोजित करण्यात आला. भाजयुमो जिल्हा अध्यक्ष तिलकजी वैद्य, माजी नगराध्यक्ष तुमसर प्रदीपजी पडोळे, नगराध्यक्ष नगर पंचायत मोहाडी छायाताई डेकाटे, उपाध्यक्ष नगर पंचायत मोहाडी शैलेशजी गभने, नगरसेवक ज्योतिषजी नंदनवार, जिल्हा महामंत्री ओबीसी मोर्चा दिनेशजी निमकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाजी फुंडे, भाजयुमो जिल्हा महामंत्री सचिनजी बोपचे, भाजपा जिल्हा सचिव बाबूजी ठवकर, जिल्हा उपाध्यक्ष व युवा वॉरियर्स जिल्हा संयोजक महेंद्र गभने,जि.विद्यार्थी आघाडी संयोजक शैलेश साउसाखरे, भाजप उपाध्यक्ष भगवानजी चांदेवार,जगदीशजी गोबाडे,रजनीशजी लांजेवार,भरती ऑफिसर रोशनलाल सिंग, निखिल कटरे, मिनाल जिभकाटे, हर्षल कुलरकर, मिलिंद मोटघरे, शशिकांत गायधने, स्थानिक युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या