वरठी येथील नेहरू वार्डातील कुटुंबीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार...





वरठी : येथील नेहरू वार्डातील  २० कुटुंबीयांनी परिसरात विकासकामे न झाल्याचे मत ठेवुन येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय.

वरठी येथील नेहरू वार्डातील या परिसरात कोणत्याही प्रकारचे विकासकामे म्हणजे रस्ते व नाल्यांसारखी शुल्लक कामे मागिल 5 वर्षात होऊ शकले नसल्याचा आरोप करत सदर व्यक्तींनी मतदानावरच बहिष्काराची भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

    रस्ते सिमेंट किंवा डांबरीकरणाचे नसल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असतो..

 अनेकदा ग्रामपंचायत निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्या गेला असल्याचा आरोप करत  येथील कुटुंबीयांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आणि  जोपर्यंत परिसरातील रस्ते, नाल्या आणि इतर विकास कामे होत नाहीत तोपर्यंत  मतदानावर बहिष्कार कायम राहिल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे एका व्हायरल व्हिडिओ वरून दिसून येत आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट देत त्यांची समजूत काढली असता लेखी आश्‍वासनानंतर तळजोळ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

.....

टिप्पण्या